Tuesday, June 1, 2021

काय बाय सांगू, कस्सं ग सांगू , मलाच माझी वाटे लाज, टूsलकिट येऊन गेलय आज..

काय बाय सांगू, कस्सं ग सांगू

मलाच माझी वाटे लाज

टूS लकिट येऊन गेलय आज..

हा लेख

जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही सुमार स्वतःला पत्रकार म्हणवणारे,

जे जर्नालिझमचा कोर्स करून अभ्यास न करता सतत स्वतःची जीभ उचलून टाळ्याला लावणारे,

माकडाच्या हातात कोलीत लाभल्यागत लिहीत सुटणारे,

फेसबुकवर लिहून स्वतःच्या मित्रमैत्रिणींकडून (त्यांच्या नकळत) लाईक्स घेऊन जनमत बदलू पाहणारे

मोदी द्वेष्टे व कसे तरी करून मोदींना नावे ठेवायची ह्या एकाच उद्दिष्टाने भारावून लिहिणारेजे टूलकिट प्रमाणे वागणारे काही पत्रकार आहेत,

कुवत नसताना नावाजलेल्या मेडीया मध्ये काम करणारे काही वार्ताहर स्वतःला नेता समजून लोकांना प्रभावित करण्याचे काम करू पाहणारे,

दुरून उंटावरून शेळ्या हाकणारे काही वार्ताहर

अशा व सुमार वार्ताहर जातीला समर्पित करत आहे. हा लेख आहे अशा सूमार वार्ताहरांपासून सावधान करणारा. कोव्हिड व लसीकरणावर जे वार्ताहर मुद्दामून संभ्रम निर्माण करू पाहत आहेत त्यावर प्रकाश टाकणारा –

१.     दोन लसी टोचण्याच्या मधल्या दिवसांतले अंतर सारखे बदलले जाते – साधारण काळात संशोधन करून लस बनवायला १० ते १५ वर्ष लागतात. पण युद्धजन्य परिस्थितीत जर एका वर्षात लस तयार केली तर दोन डोसांमधले अंतर लसी करण करता करता येणाऱ्या अनुभवांवर ठरवण्यात येते. त्यात काही गैर नाही. त्यात काही राजकारण नाही. साधारण अंतर ठरवण्यात त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व नामवंत जे त्या वेळेला बरोबर समजतील ते ते केले जाते. त्यांची समज सुद्धा अनुभवावर आधारीत असल्यामुळे बदलत राहाते. त्यात काहीही वावगे नाही, एक्सरे चा शोध लागला तेव्हा मेरी क्युरीने एक्सरे मशीन पहिल्या महायुद्धात वापरले व हे करता करता एक्सरे चे दुष्परिणाम व वापरायचा शिष्टाचार अनुभवाने शिकले गेले व ठरवले गेले. कोणी अमेरिकन राष्ट्रपती किंवा राणीवर ताशेरे झाडले नाहीत. पण आमचे वीर वार्ताहर मोदींना नावे ठेवून मोकळे. उगाच नावं ठेवायच्या ऐवजी आपण तज्ज्ञांवर सोडलेले बरे एवढी पण अक्कल नाही किंवा मुद्दामून संभ्रम तयार करायचा म्हणून बातम्या देताना किंवा ट्विट करताना १२ ते १८ आठवड्याचे अंतर हे स्पष्ट नाही सांगणार. पण फक्त १८ आठवडे एवढेच सांगतील. नाव घेतले तर आवडणार नाही काही वार्ताहारांना. पण कोणाला त्यात रस असेल तर विचारावे.

 २.     लसीकरण हळू हळू चालले आहे – आज भारत दर तीन चार दिवसाला एका न्यूझीलंड एव्हढे लसीकरण करत आहे. लस तयार होण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लस बनू शकणार नाही. कोणत्याही भारता एवढ्या जनसंख्या असणाऱ्या देशाला ३  महिन्यांत लसीकरण जमू शकणार नाही. अशक्य आहे. जे पत्रकार टक्केवारी घेऊन बोलतात ते प्रारंभीच चुकीचे बोलतात. एकतर गणित व स्टॅटिक्सटीक्स कशाशी खातात ते माहीत नसणार किंवा माहीत असेल तर मग मुद्दामून लोकांना भटकवण्यासाठी करतात असाच निष्कर्ष काढावा लागेल.   टक्केवारी वर बोलण्यासाठी सगळ्या देशांची लोकसंख्या एक असायला पाहिजे. पण लोकसंख्येत फार फरक असेल तर टक्केवारी चुकीचे चित्र साकार करते. कोविन वर लसीकरणाचे स्लॉट मिळणे मुश्किलीचे आहे हे सध्याचे चित्र आहे. सध्या लसीची मागणी व लस ह्यात साधारण ६.५ :: १ एवढा फरक आहे. पण हे चित्र ह्याच महिन्यात बदलेल. तरी सुद्धा रोज १५ ते २० लाख लसीकरण होते ह्याचा अर्थ ते होते. जसे जसे (पूढच्या महिन्यापासून) जास्त पुरवठा होईल तसं तसे सगळ्यांना मिळेल.

 ३.     मी घेणार नाही. कसे आहे काय होईल माहीत नाही. लसीकरणाची घाई केली जात आहे.  – बरेच पत्रकार छाती ठोकून हे चॅनलवर सांगत होते (कोणाला नाव जाणून घ्यायचे असेल तर विचारावे) व आता हेच पत्रकार आम्हाला पहिल्यांदा लस द्या कारण आम्ही पण फ्रंटलाईन वर्कर हे बोलायला लागले आहेत. कित्येक कांग्रेसी लोकांनी हळूच लस घेतली. समाजवादी पक्षाने तर लसींला भाजप लस असे नाव दिले होते व तरी सुद्धा आता म्हणतात लसीकरण होत नाही. हाच दुटप्पीपणा परिपक्व म्हणवणारे पत्रकार पत्रकारीता करताना दाखवतात.

 ४.     मृतकांची संख्या चुकीची व कमी दाखवत आहेत केंद्रसरकार – कांग्रेस पासून पावसाळी छत्र्‍यांसारख्या उगवणाऱ्या पत्रकारांपर्यंत हे सांगत फिरत आहेत. केंद्र सरकार राज्यांनी दिलेले आकडे जोडून यादी तयार करतात. मग खोट कोण बोलत आहे.

 ५.     दुसऱ्या वेव साठी तयारी नव्हती – इस्पितळ ऑक्सिजन पुरवणे हे स्वास्थ्य विभाग बघतो व हा राज्य विषय आहे. केंद्रसरकार ने दिलेले दिशा निर्देश किती राज्यांनी पाळलेत. गेल्या वर्षी मार्च मध्ये केंद्र सरकार नी राज्यांना सुचीत केले होते. किती राज्यांनी तयारी केली. ममता तर साध्या मीटिंगला सुद्धा गैरहजर राहाते. पत्रकारांना राज्यांचे विषय कोणते व केंद्रांचे विषय कोणते हे माहिती तरी आहे का व माहिती असेल तर मग विषय मांडताना तसे दिसत नाही उगाच वेड घेऊन पेडगावाला  जायचे असे दिसते. तिसरी वेव येणार त्याची तयारी करा. फायजर लस आणा अशी ओरड सुरू झाली आहे. लहान मुलांना होईल ह्याची आता पासून भिती लोकांच्या मनात भरवायला सुरवात झाली आहे. लस हा बिल्यन डॉलर व्यवसाय आहे व त्यातून बऱ्याच लसी भारतात बनायला लागल्या मुळे खूप जणांच्या पोटीत दुखायला लागले आहे. कारण भारत एक मोठी बाजारपेठ आहे व फायजर वगैरे  कंपन्या भारत एक लस बनवण्यात अग्रेसर देश आहे ह्या कल्पनेनी ग्रस्त आहेत. त्यांची लस घ्या ह्या वातावरण निर्मितीला आता सुरवात झाली आहे. ह्या परदेशी कंपन्यांच्या कामात किती वार्ताहर व राजकारणी सोपा मार्ग पत्करतात ते बघायचे. सुज्ञांना एवढे सांगणे पूरे. त्यांना समजेल काय म्हणायचे आहे ते.

 ६.     पिएम केअर व सिएम रिलीफ फंड – पिएम केअर बद्दल सगळे विषय सर्वोच्च न्यायालयाने तपासून त्यात काही गैर नाही हे सांगितले आहे. तेव्हा कोणाला ज्याच्यात जे द्यायचे आहे ते द्यावे. पण दर काही दिवसांनी त्यावर कार्यक्रम करून केअर फंड बद्दल ओरड करून अशा वार्ताहरांचा उद्देश कोणी तरी दुसरा ठरवतो असे वाटते.

 ७.     ह्याला जबाबदार केंद्र सरकार – नुकत्याच घेतलेल्या अमक्या तमक्या सर्वेक्षणात मोदींनी दुसरी लाट आणली.. मोदी गेले .. आता त्यांचे काही खरे नाही.. एका वार्ताहराने तर  (राजकीय दृष्ट्‍या कोणत्याही विचार प्रवाहाची नाही व फक्त बातम्या देणारी व्यक्ती) सरळ हेच छापले ....” करोना काळात सगळ्यात वाईट कामगिरी करणारा नेता कोण यावर ९० टक्के मतं मोदींना XXXXX . पुढच्या काही वर्षात XXXXX तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, बघ!  मी - तो दिवस सेलिब्रेट करू आपणXXXXXXXXX अनेक भक्ताडांबरोबरच्या संबंधांवर मी या देवामुळेच स्टे आणलाय. हे एवढे टोकाचे मोदी द्वेष्टे काय पत्रकारिता करणार व त्यांच्यावर मग विश्वास कोण ठेवणार. ते वार्ताहर होऊच शकत नाहीत. वार्ताहर म्हणवून फेसबुकवर कोणाचा तरी अजेंडा राबवणारा टूलकीट प्रेमीच असू शकतो. हास्यास्पद हे आहे की हे वार्ताहर फेसबुकचा चा उपयोग करून स्वतःच्या मित्रांकडून टाळ्या वाजवून घेतात. 

No comments:

Post a Comment