Saturday, July 21, 2018

पप्पूची झप्पी


काल झालेल्या अविश्वास प्रस्तावात बोलताना खोटे दाखले देऊन असंबद्ध हातवारे करत केलेले भाषण सगळ्यांनी ऐकले. भाषण संपवताना नंतर प्रसंगाला अनुरूप व साजेसे वागणे सोडून पंतप्रधानांना उठण्याचा इशारा करत त्यांच्या गळ्यात पडलेला काँग्रेसचा अध्यक्ष पाहिला. हे ही थोडके नव्हते की काय, आपल्याला जागी बसल्यावर कोणाची टिंगल करावी तसे डोळे मिचकावणे म्हणजे बालिशपणाचा कहरच झाला. स्वतःचे पद, समोर कोण आहे व कोठे आहात ह्याचे भान न ठेवून टीआरपी वाढवण्यासाठी व हिंदू असणे म्हणजे काय हे दाखवण्यासाठी येडपटासारखे गळी पडायचे हे राहुल गांधीच करू जाणे. हिंदू धर्मात वयाने व कर्तृत्वाने मोठ्यांच्या लहानांनी पाया पडावे असा प्रघात आहे. गळी नाही पडत कोणी. 

काँग्रेसचा पक्षाध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या राहुल गांधीने आज त्याची मानसिक वैचारिक व बौध्दिक पातळी दाखवली. असल्या माणसाच्या भाषणाला दुजोरा देणारे व वाह वाह करणाऱ्या लोकांच्या वैचारिक, बौधिक व मानसिक पातळीची कल्पना आपोआपच येते. 

Monday, July 16, 2018

घरगुती औषध : १ - पित्तामुळे होणारी डोकेदुखी



१)    पित्तामुळे होणारी डोकेदुखी

पित्ताची लक्षणे
पित्त वाढले हे कसे कळावे ते थोडक्यात येथे देत आहे. डोके, मान दुखायला लागणे, मळमळण्या सारखे वाटणे, खूप भूक लागणे पण थोडे खाल्ल्या बरोबर पोट फुगल्या सारखे किंवा भरल्या सारखे वाटणे, तळहातावर पुरळ येणे. खूप पित्त झाले तर ओकारी सारखे वाटणे किंवा ओकारी होणे, किंवा पाठीवर व दंडावर पुरळ उठणे, डोळ्याला दिसण्यास तातपूरता त्रास होणे ह्या सगळ्या किंवा ह्यातली काही लक्षणे उद्भवतात.
साहित्य
खजूर, काळ्या मनुका, पादेलोण, आमसुले
विधी
२ खजूर, ८ काळ्या मनुका, टीचभर पादेलोण, २ आमसुले अर्ध्या कपात रात्री भिजत घालावीत (कोणाला मिक्सर मधून काढून घ्यावसे वाटले तर घ्यावे. ह्याच प्रमाणात चार दिवसाचे औषध करून फ्रीज मध्ये ठेवल्यास सोपे जाईल. जास्त दिवसाचे केल्यास ते आंबुसते व खाण्यास योग्य राहतं नाही).
मात्रा
दिवसातून एकदा सकाळी अनशा पोटी भिजलेले मिश्रण सेवन करावे. ज्यांची पित्तकारक प्रकृती असते त्यानी रोज घ्यावे.
औषध लागू पडले हे कसे समजावे
उगाच व अवेळी लागणारी भूक कमी होईल. डोके दुखणे कमी होईल (दुखलेच कधी तर सौम्य दुखेल). उन्हात हिंडताना सुद्धा डोके दुखण्यावर नियंत्रण राहिल. पोटाला हलके वाटेल. शौचाला नियमित होईल. पुरळ उठणे कमी होईल.
औषधाच्या कृतीची साभार पोच
कर्नल रणजित चितळे



घरगुती औषधे


आपल्याकडे पिढ्यांपिढ्या पासून वापरातली आयुर्वेदिक औषधे आहेत. त्यातली बरीचशी आपल्या स्वयंपाकघरात सापडणारी असतात व त्यामुळे वेळी अवेळी आपल्या हाताशी राहतात. काही लागले व जखम झाली की आपण चटकन हळद लावतो. हळद लावणे आता वैद्यकीय दृष्ट्‍या इष्ट मानले गेले आहे. आपल्या आजी, आजोबा किंवा आई वडिलांकडून आपल्याला जी औषधे कळली त्या त्या औषधांचा आपण वापर करतो, पण एका पिढीहून दूसऱ्या पिढी पर्यंत पोहोचेतो त्यातली काही औषधे विसरली जातात. हळूहळू आपण साधी पण प्रभावी औषधे विसरू लागतो. पण आता विसरू लागलेली व माहीत नसणारी औषधे विविध लोकांकडून संकलित करून एका जागी आणणे इंटरनेट मुळे सहज शक्य झालेले आहे.

बोलघेवडा संकेत स्थळाच्या माध्यमातून मी एक नवे पान सुरू करत आहे त्यात आपल्या कोणाला नेहमीच्या आजारांवर सोपी औषधे माहीत असतील तर ती मला ranjit.chitale@gmail.com वर पाठवा. मी बोलघेवड्याच्या पानात समाविष्ट करेन. जर का एखादे प्रभावी औषध तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून असेल तर येथे द्यावे. ऐकीव किंवा इंटरनेट वरून डाऊनलोड करून देऊ नये.  सुरवात म्हणून मी मला माहीत असलेले एक औषध देत आहे. त्याच साच्यात बसेल असे लिहून पाठवावे. सोबत आपला दूरध्वनी क्रमांक दिलात तर मी पानावर चढवण्या आधी आपल्याशी बोलून मला खात्री करता येईल. औषधाच्या श्रेयनामावलीत आपले नाव दिले जाईल.

फक्त घरगुती औषधेच द्यावीत. आयुर्वेदात काही धातू (चे भस्म) किंवा रस हे वापरले जातात. ते जरी प्रभावी असले तरी त्याला वैद्यांचा सल्ला लागतो. ह्या संकेतस्थळावर अशी औषधे नाही दिली जाणार. धातू किंवा रसाचे सेवन वैद्याना विचारूनच करावा. व त्यामुळे अशी औषधे येथे दिली जाणार नाहीत तरी अशा औषधे येथे कृपया देऊ नयेत.