Monday, July 16, 2018

घरगुती औषध : १ - पित्तामुळे होणारी डोकेदुखी१)    पित्तामुळे होणारी डोकेदुखी

पित्ताची लक्षणे
पित्त वाढले हे कसे कळावे ते थोडक्यात येथे देत आहे. डोके, मान दुखायला लागणे, मळमळण्या सारखे वाटणे, खूप भूक लागणे पण थोडे खाल्ल्या बरोबर पोट फुगल्या सारखे किंवा भरल्या सारखे वाटणे, तळहातावर पुरळ येणे. खूप पित्त झाले तर ओकारी सारखे वाटणे किंवा ओकारी होणे, किंवा पाठीवर व दंडावर पुरळ उठणे, डोळ्याला दिसण्यास तातपूरता त्रास होणे ह्या सगळ्या किंवा ह्यातली काही लक्षणे उद्भवतात.
साहित्य
खजूर, काळ्या मनुका, पादेलोण, आमसुले
विधी
२ खजूर, ८ काळ्या मनुका, टीचभर पादेलोण, २ आमसुले अर्ध्या कपात रात्री भिजत घालावीत (कोणाला मिक्सर मधून काढून घ्यावसे वाटले तर घ्यावे. ह्याच प्रमाणात चार दिवसाचे औषध करून फ्रीज मध्ये ठेवल्यास सोपे जाईल. जास्त दिवसाचे केल्यास ते आंबुसते व खाण्यास योग्य राहतं नाही).
मात्रा
दिवसातून एकदा सकाळी अनशा पोटी भिजलेले मिश्रण सेवन करावे. ज्यांची पित्तकारक प्रकृती असते त्यानी रोज घ्यावे.
औषध लागू पडले हे कसे समजावे
उगाच व अवेळी लागणारी भूक कमी होईल. डोके दुखणे कमी होईल (दुखलेच कधी तर सौम्य दुखेल). उन्हात हिंडताना सुद्धा डोके दुखण्यावर नियंत्रण राहिल. पोटाला हलके वाटेल. शौचाला नियमित होईल. पुरळ उठणे कमी होईल.
औषधाच्या कृतीची साभार पोच
कर्नल रणजित चितळे2 comments: