Sunday, August 12, 2012

पेटलेले आसाम


गेले एक महिना आसाम पेटलेले आहे. भडकलेल्या दंग्यात शेकडो मरण पावले आहेत. हजारोंना दुखापत झाली आहे तर लाखो बेघर झाले आहेत. ह्या दंग्यांमागे कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. घुसखोर बांगलादेशी मुसलमान लाखोंच्या संख्येने आज आसाम मध्ये वसलेले आहेत. मत पेट्यांच्या ह्या राजनीतीत त्या घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना रेशनकार्ड व व्होटर आयडी कार्ड पण मिळाली आहेत. ह्या घुसखोरांनी आसामाचे बोडो व आसामी लोकांचे जिणे मुश्कील करून टाकले आहे. त्यांना धाक दाखवून दहशत माजवून सळोकापळो करून सोडले आहे. जर हे थैमान असेच चालू राहू दिले तर थोड्याच दिवसात काश्मिरात जसा काश्मिरी पंडितांचा प्रश्न सुरू झाला तसा येथे पण व्हायला वेळ लागणार नाही. काश्मिरी पंडितांसारखे इथल्या लोकांना त्यांचे राज्य सोडून पळून जावे लागणार. मुंबईत ज्या रितीने राझा ऍकॅडमी तर्फे घुसखोरांना पाठिंबा दाखवण्यात येत आहे त्या वरून आपल्या लोकांनी ता वरून ताकभात ओळखावे.वृत्तसंस्थांनी सुद्धा ह्या घुसखोरांबद्दल व आसामात होणाऱ्या दंग्यांबद्दल वस्तुनिष्ठ राहून बातम्या दिल्या पाहिजे. ह्या पार्श्वभूमीवर तिस्ता सेतलवाड, अरुंधती रॉय व मानव हक्क संघटनांना मला असे विचारावेसे वाटते की आता मूग गिळून का बसला आहात? गुजरात मध्ये तर आपण फार आग पाखडत आहात, मग येथे काय झाले. का बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध न बोलण्याचा कोणाच्या बरोबर करार झाला आहे?
1 comment:

  1. आपली असमिया भाषा जपण्यासाठी घुसखोरानी आपली भाषा असमिया म्हणून नोंदविल्यावर त्याना डोमिसाईल सर्टिफिकेट गैरहजर असतानासुद्धा देणाऱ्या आसामला कशी मदत करावी? हे सर्टिफिकेट देण्याचे अधिकार ग्रामप्रमुखाकडे आहेत.

    ReplyDelete