पुण्याच्या पिएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहीलेल्या एका सुचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. ‘पुढे सरकत रहा’ अशी सुचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी लिहीलेली असते. ही सुचना मागच्या दारातून येणा-या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारादून उतरणा-या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते.
ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरु होण्या अगोदरच सुरु होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सुचक आहे. वेगवेगळ्या पातळीवरुन बघीतले तर त्यातून केवढा बोध मिळतो.
पुर्णपणे भौतिक अर्थ घेतला तर आपण जे काम करतो, छंद जोपासतो त्यात निपूण होऊन आपल्या प्रतिभेची पुढची पायरी गाठा व मागून येणा-यांना जागा करुन द्या असा होतो. ब-याच लोकांना मागून येणा-याना जागा करुन द्यायचे जिवावर येते, ह्याला कारण की ते जेथे असतात तेथे आता ते स्थिरावलेले असतात. त्यांना रोजचे काम नेहमीचे झालेले असल्या कारणाने ते करण्यासाठी फार श्रम घ्यावे लागत नाहीत. पाट्या टाकावे तसे ते काम करतात. पुढे सरकायचे म्हणजे जेथे ठेवला नसतो तेथे पाय ठेवावा लागतो. ह्या साठी नव्या गोष्टी शिकाव्या लागतात. श्रम करायची तयारी लागते. पुढे सरकून नवे शिकताना मिळणारी अस्थिरता माणसाला बोचते. अस्थिरतेला तोंड द्यावे लागते. नव्या जागेवर आपल्याला कामात आपले कौशल्य दाखवावे लागते. लोकांना आपले काम आवडायला वेळ लागतो व आपला वेळ लोकांना पटवून देण्यात जातो. एक
दुस-यामध्ये नाते जमवायला वेळ लागतो. मेळ बसवायला ब-याच खस्ता खाव्या लागतात. त्यापेक्षा असतो तिथेच राहीलो तर काम येत असल्या मुळे सोपे जाते. झालेल्या ओळखींचा उपयोग कामात होतो व चटकन आपले काम दुस-याच्या नजरेत भरते. त्यामुळेच खुप वेळा माणूस आहे त्याच जागेवर पाय रोवून ठेवतो व मागच्याला येऊ देत नाही आपल्या जागेवर. काही लोकंतर स्वतः पुढे सरकत राहतात पण मागच्याला तरी सुद्धा पुढे येऊ देत नाहीत.
दुस-यामध्ये नाते जमवायला वेळ लागतो. मेळ बसवायला ब-याच खस्ता खाव्या लागतात. त्यापेक्षा असतो तिथेच राहीलो तर काम येत असल्या मुळे सोपे जाते. झालेल्या ओळखींचा उपयोग कामात होतो व चटकन आपले काम दुस-याच्या नजरेत भरते. त्यामुळेच खुप वेळा माणूस आहे त्याच जागेवर पाय रोवून ठेवतो व मागच्याला येऊ देत नाही आपल्या जागेवर. काही लोकंतर स्वतः पुढे सरकत राहतात पण मागच्याला तरी सुद्धा पुढे येऊ देत नाहीत.
पारमार्थिक अर्थ अगदी सरळ, सोपा व साधा आहे. पुढे सरकत रहा. आपण पुढे सरकत राहून राहीलेल्या आयुष्यात आपल्या असलेल्या चित्ताच्या पातळीतून पुढच्या पातळीत सरकत रहावे. आज जर आपण मद, मत्सर, लोभ, भेद ह्याने ग्रासलो असू तर पुढे सरकून हे जड दगड धोंडे मागे ढकलून द्यावेत म्हणजेच चित्त शुद्धीच्या पाय-यांवर पुढे सरकत रहावे. असे म्हणतात चित्ताच्या जागरुकतेत प्राणीमात्रांमध्ये मनुष्यजन्म ही खुप वरची पायरी आहे. पण मनुष्य जन्मात सुद्धा चित्ताच्या जागरुकतेच्या पातळ्या आहेतच की. त्या पाय-या चढून पुढे सरकत आत्मशुद्धीची अंतीम व परमोच्च पायरी गाठायच्या ध्येयाचे बिज ‘पुढे सरकत रहा’ ह्यात लपलेले आहे.
कधी कधी ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्या प्रमाणे आपले आयुष्य होते. ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले असतो तेव्हा ज्या वाहनात आपण प्रवास करत असतो त्या वाहनात असलेल्या शक्तीचा तो जॅम फोडायला काही जसा उपयोग होत नसतो. नाईलाजाने जॅम मध्ये अडकलेल्या वाहन चालकाला ट्रॅफिक प्रमाणे जॅम सुटे पर्यंत हळू हळू वाहन हाकत पुढे सरकत रहावे लागते. तसेच आपल्या आयुष्याचे आहे. ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्या मुळे संथ गतीने गाडी हाकावी लागते तसेच विपरीत परिस्थितीत स्वतःची कितीही प्रतिभा असली तरी तिला फुलोरा येत नाही. त्या वेळेला सुद्धा पुढे सरकत रहा हे वाक्य उपयोगी पडते. जॅम संपे पर्यंत हळूहळू पुढे सरकत राहण्यातच शहाणपण असते. नाहीतर पुढच्याला धक्का तरी लागतो, किंवा मागच्याच्या शिव्या तरी झेलाव्या लागतात. अशा वेळेला आयुष्याची साडेसाती संपे पर्यंत असेच संथ गतीने पुढे सरकत राहीलेले बरे असते. मोठे अपघात होत नाहीत ट्रॅफिक जॅम किंवा चाकोरी बद्ध आयुष्यात – अनंत फंदींनी त्यांच्या फटक्यात म्हटलच आहे -
बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको, संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||
No comments:
Post a Comment