Tuesday, June 12, 2018

हताशा, घाई व नैतिक दिवाळखोरी



राहुल गांधींचे लहानपण ऐषारामात गेल्यामुळे व त्यांच्या घरचे प्रमुख राजकारणात उच्चपदस्थ राहिल्यामुळे त्याला सत्तेची सवय लागली आहे व सत्तेच्या बाहेर राहणे म्हणजे जलबिन मछली सारखे वाटायला लागले आहे. लवकरात लवकर कसे पंतप्रधान व सत्ता हातात येईल ह्याचा विचार सतत चाललेला दिसत आहे. त्यासाठी वाटेल तो अट्टहास चालू झाला आहे. 
पहिल्यांदी केंब्रिज अनॅलिटीका कडून डाटा विकत घेतल्याच्या तथाकथित बातम्या आल्या. त्याचा उपयोग उना व गुजरातच्या निवडणुकांमधून भ्रमराने केला गेला.
त्या नंतर जिग्नेष मेवाणीशी साठगाठ घालून सगळ्या भारतात व भाजप प्रणीत राज्ये कसे दलित विरोधात आहेत हे दाखवण्यासाठी माओईस्टांबरोबर मैत्रीकरून दंगे घडवले गेले.
मोदींच्या विरुद्ध कट उघडकीला आला तेव्हा पुढे हे प्रकरण वाढत जाणार हे जाणवले. २०१९ च्या निवडणुका संपे पर्यंत हे असेच चालू राहणार.
अरुंधती रॉय सारखे लोक राष्ट्राविरोधात बोलत राहणार, मेवाणी सारखे विष कालवत राहणार.
पैसे घेऊन काही पत्रकार व लेखक आग लावत फिरणार.
ह्या सगळ्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे व इतरांनाही वेळोवेळी सावध केले पाहिजे.