काश्मीर मध्ये अस्थिरता होतीच. त्यातच काही महिन्यांपूर्वी तेथील
सरपंचांना मारून लोकांमध्ये लोकशाही विरुद्ध भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.
त्यानंतर जवळजवळ शंभर शाळा जाळून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचा
प्रयत्न केला गेला. नोटाबंदी नंतर पैसे कमी पडायला लागले म्हणून पतपेढ्या लुटण्याचा
प्रकार सुरू झाला. पैसे देऊन बेरोजगार युवकांकडून
पोलीस व सैन्यावर दगड फेक करवून जगाला काश्मीर मध्ये कसा गदारोळ चालला आहे हे दाखवण्याचा
सध्या हुरियतचा सतत प्रयत्न चाललेला आहे. मुसलमान जनतेला दगड फेक नवे नाही. काही शतकांपूर्वी
पासून कट्टर मुसलमान, अपराध्याला दगडफेक करून मारणे, जनतेसमोर फाशी देणे किंवा चाबकाचे फटके देणे ह्या शिक्षा ठोठावत
आलेले आहेत. असे करणे मुसलमान व्यतिरीक्तांसाठी भयानक असू शकेल पण कट्टर मुसलमानांना
हे नित्याचे आहे. मुसलमान समाजाने मानलेल्या शिक्षांपैकी ह्या आहेत. आता अपराधी कोण
हे जर हूरीअत किंवा अतिरेकी संघटनाच ठरवणार असतील तर त्यांच्या दृष्टीने भारतीय सैन्य
व जम्मू काश्मीर पोलीस काफर व त्यामुळे साहजिकच अपराधी ठरणार. त्याचाच परिणाम म्हणजे
जम्मू काश्मीर मधल्या भारतीय सैन्यातल्या अधिकऱ्याला गोळ्या घालून त्याला "शिक्षा"
देऊन लोकांपुढे आव्हानच उभे केले जणू.
हूरायतच्या स्वयंघोषीत नेत्यांनी, स्वतःला भारताचे नागरिक
कधी समजलेच नाहीत. पाकिस्तानने फेकलेल्या पैशांवर अवलंबून असलेल्यांची वक्तव्यपण पाकिस्तान
धार्जिणी असतात हाच अनुभव आपल्याला आलेला आहे. हिजबूल मुजाहीदीनने दोनच दिवसांपूर्वी
घोषित केले की त्यांचा झगडा जिहाद व इस्लामिक स्टेटसाठी आहे व आझाद काश्मीरसाठी नाही.
काश्मीरियतसाठी नाही किंवा काश्मिरी लोकांसाठी नाही
हे सगळे असे असल्या कारणाने कॉलेज जाणाऱ्या मुलामुलींच्या मनावर
विकृत परिणाम घडवू इच्छीणाऱ्या हूरायत. लष्करेतोयबा, हिजबूल मुजाहीदीन सारख्या
संस्था आहेत त्या दिवस रात्र त्याच प्रयासात आहेत. त्यांच्या हाती बंदुका देणे. दोन, चार वर्षाच्या मुलांचे एके ४७ बरोबरचे फोटो सोशल मिडिया मध्ये
छापणे, एक दोन महिन्यांच्या मुलांच्या डोक्यावर इस्लामिक
स्टेटच्या पट्ट्या बांधून लोकांना दाखवणे हे सगळे त्याच विकृत मनाची लक्षणे आहेत. इस्लामाबादच्या
व्यापाऱ्यांकडून सौदी अरीबियाच्या हवाला वाटेने हूरायतकडे आलेले पैसे दगड फेकणाऱ्या
बेरोजगार काश्मिरी युवकांना देऊन अशांती भडकवण्याचा कार्यक्रम दिवस रात्र चालला आहे
त्याला लागलीच आळा घातला गेला नाही तर गोष्ट हाता
बाहेर जाऊ शकते.
हे काही भाजपचे सरकार असल्या कारणाने होत आहे अशातला भाग नाही
तर हा पाकिस्तान व इस्लामिक स्टेटवाल्यांचा पूर्व नियोजित कट आहे. जेणे करून काश्मीरच्या
अतिरेकी चळवळीने जिहाद सगळ्या जगात पसरेल हाच कार्यक्रम दिसतो व तसेच घडत आहे. हे जाणून
आपण देशवासीयांनी, राष्ट्रभक्तांनी, समविचारांच्या राजकीय
पक्षांनी व सरकारने त्या विरुद्ध सशक्त मोहीम उघडायला पाहिजे.
काश्मीर वाचवण्यासाठी अशा मोहिमेचे स्वरूप असे असावे –
- हूरायत वर
बंदी. त्यांचे सगळे पैशांचे व्यवहार ED व बाकीच्या सरकारी
इंटेल नी तपासणे. सगळे पैशांचे मार्ग बंद करणे.
- काश्मीर मध्ये
सोशल मिडिया सहा महिन्यांसाठी बंद करणे.
- सगळे जिहादी
व इस्लामिक स्टेट सदृश IP
addresses, व जे जे कोणी बंदूकवाले
फोटो वा विडीओ अपलोड करते त्यांची छाननी करून तपशील जाणून घ्यावा. त्यावर कडक कारवाई
करणे.
- घातपात करणारे, अतिरेकी व देगड फेकू लोकांविरुद्ध बळाचा वापर करून त्यांचे कार्यक्रम
पूर्णपणे थांबवणे. ह्या आधी आंतरराष्ट्रीयं स्तरावर मोठ्या राष्ट्रांबरोबर मतैक्य घडवून
आणावे लागेल व आपल्या बाजूने त्यांना खेचावे लागेल. मोदी सरकारने ते त्वरित केले पाहिजे.
- वृत्तपत्र
व टीव्ही बातम्या देणाऱ्या वहिनींना पहिल्यांदा राष्ट्रहीताच्या ह्या कामाचा अंदाज
देणे आवश्यक आहे. व त्यांनी परिपक्वता दाखवून
बातम्या छापताना राष्ट्रहीत जाणून बातम्या द्याव्यात हे महत्त्वाचे.