Wednesday, May 20, 2015

मोदी सरकारचे एक वर्ष

मोदी सरकारचे एक वर्ष पूर्ण झाले. त्याचे विच्छेदन करायला लोकांनी सुरवात केली आहेच. त्यांच्या चाहत्यांकडून कौतुक व विरोधकांकडून शिव्यांचा भडिमार होऊ लागला आहे. काँग्रेसचे लोक कुठे गेले तुमचे अच्छे दिनअसे विचारण्यात मशगुल आहेत. इंग्रजी वृत्तपत्रवाले टीआरपी रेटिंगवाल्या बातम्यांच्या मागे लागलेले असतात त्यामुळे देशा पुढल्या खऱ्या अडचणी, देशाचे भवितव्य व लोकांना अडणाऱ्या गोष्टींवर क्वचितच बोलतात.

 

मोदींचे एक वर्ष माझी समीक्षा

 

राष्ट्रनिर्माण एका दिवसात होत नाही. आपल्या सगळ्यांना स्वच्छ वातावरण, नियोजन व आधुनिकीकरण   आवडते. लोकशाहीमध्ये हे घडायला थोडा वेळ लागतो. एक वर्षा पेक्षा नक्कीच जास्त. म्हणूनच सरकारला ५ वर्ष दिलेली असतात. धीरा पोटी फळे गोमटी. Prudent Gradualism.

 

इमारत बांधताना, सगळ्यात महत्त्वाचा तिचा पाया असतो. पाया भरून इमारतीचा पहिला मजला सुरू होई पर्यंत लोकांचे सहज लक्ष जात नाही. राष्ट्रबांधणीचे पण असेच आहे. पाया भरणीचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे असे त्यांच्या एक वर्षाच्या कामावरून कळून येते. काहीजण वाट बघायला तयार नसतात, बरेच निराश होतात. बऱ्याचजणांना संशय येऊ लागतो. मोजकेच थोडे वाट बघतात व हेच इष्ट आहे.

 

 

जन धन योजना

आर्थिक दृष्ट्या गरीब, रोजगारी करणाऱ्या वर्गाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी. त्या आधारे त्यांना, विमा व पेन्शन देण्याची मोठी योजना सुरू केली गेली.

 

E – लिलाव

कोळशाच्या खाणी व अशाच प्रकारच्या सगळ्या नैसर्गिक संपदांचा लिलाव केल्याने भ्रष्टाचार कमी होतो व राजस्व वाढते.

 

स्वच्छ भारत अभियान

आपल्या जनमानसात भिनायला दोन पिढ्या तरी जायला हव्यात. स्वच्छतेचे महत्त्व भारताच्या पंतप्रधानाने अंगिकारले व ह्या अभियानाला जोर दिला तर जास्त महत्त्व. आपण सगळे आजूबाजूच्या गलिच्छ परिसराला कंटाळलो आहोत. आपल्या देशातल्या सार्वजनिक जागा किती गलिच्छ आहेत त्याचा अंदाज सर्वांनाच आहे. सगळ्यांना स्वच्छता हवी आहे. हे साफ करायला पंतप्रधानांची साथ मिळाली ही तर कौतुकच.

 

काळा पैशावर अंकुश

ह्या कायद्याने देशा बाहेर जाणारा काळ्या पैशावर अंकुश लागेल असे वाटते.

 

संरक्षण सौदे

बरीच वर्षे रेंगाळत राहिलेले सुरक्षा खरेदीचे सौदे पारिकरांनी काही महिन्यात आटोपले. सुरक्षादलाचे आधुनिकीकरण अडले होते ते बऱ्याच अंशी आता मार्गी लागेल. पाणबुड्या, हेलिकॉप्टर, विमाने सगळ्या विषयांना पारिकरांनी हाताळले व मार्गी लावले.

 

विदेश नीती

प्रत्येक राष्ट्राला भेट दिली तेव्हा भारतासाठी आर्थिक गुंतवणूक निश्चित करायचा प्रयत्न केला. शेजारी देशांबरोबर देशाच्या सीमा पक्क्या करायचा प्रयत्न केला.   

 

नैसर्गिक आपत्ती

नेपाळची मदत असो किंवा येमन मधून भारतीयांना सोडवून आणायचे काम असो मोदी सरकारने वेळ न घालवता आलेल्या सगळ्या नैसर्गिक व राजनैतिक आपत्तीला चांगले तोंड दिले.

 

जमीन अधिग्रहण कायदा

जमीन असल्या शिवाय, उद्योग, कारखाने गावा गावातून उभे राहणार नाहीत. कारखाने लोकांना नोकऱ्या देतात व नियमित वेतन.

 

ता.क. आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवून ठेवायचे असेल तर पिढ्या पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहिजे, आपला स्वभाव झाला पाहिजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहिजे. हे एका वर्षाचे काम नाही.